भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले

नवी दिल्ली /७ एप्रिल - कोरोना आजारावर परिणामकारक ठरणारी हायड्रो क्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल ही औषधे वगळता इतर 24 अत्यावश्यक औषधांवरील निबंध भारताने उठवले आहेत. देशातील या औषधांची गरज पूर्ण झाल्यानंतर या औषधांच्या निर्यातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. भारत हाजेनेरिक औषधांची निर्मिती करणा-या प्रमुख देशांपैकी एक आहे. भारताने अत्यावश्यक औषधांची निर्यात थांबवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात हायड्रोक्लोरोक्वीन या गोळीसह इतर औषधांचा तुटवडाजाणवत आहे.